युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

वांजरी येथील घटना

15

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील वांजरी येथील एका 32 वर्षीय युवकानी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुमारास उघडकीस आली. विजय नामदेव येरेकार रा. वांजरी असे मृत युवकाचे नाव आहे. मृत युवकाचे काका महादेव सीताराम येरेकार (48) रा. वांजरी यांनी वणी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. मृतक विजय हा रोजमजुरीचे कामे करायचं तसेच त्याला दारू पिण्याची सवय होती. मंगळवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत विजय येरेकार हा काकाच्या पानठेल्यावर बसून होता. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन स्वयंपाकघरात फाट्याला साडीचाच्या सहाय्याने गळफास घेतला. मृतक विजय यांनी दारूच्या नशेत गळफास घेतला असावा. असे फिर्यादमध्ये नमूद करण्यात आले आहे. वणी पोलिसानी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरणीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.