भीमनगरमध्ये एकाच रात्री दोन घरफोड्या

एका ठिकाणी 80 हजार तर दुस-या ठिकाणी 1.5 लाखांची चोरी

0 11

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 26 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास वणीतील भीमनगर परिसरात चोरट्यांनी दोन घरे फोडले.  एका ठिकाणी 80 हजार तर दुस-या ठिकाणी 1.5 लाखांचा डल्ला चोरट्यांनी मारला. यातील एका व्यक्तीने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर दुसरा व्यक्ती हा बाहेरगावी असल्याने तक्रार देऊ शकला नाही.

बाळू टेंभुरकर यांचे भीमनगर येथे किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री त्यांनी दुकान बंद करून 80 हजार रुपये बंद असलेल्या फ्रीजमध्ये ठेवले. मध्यरात्री दरम्यान चोरट्यांनी शटर फोडून दुकानात प्रवेश केला व दुकानातील रोख रक्काम चोरून नेले. त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे.

दुसरी चोरी ही अमोल युवराज भगत यांच्या घरी झाली असून तो गोंडपिंपरी येथे बँकेत कर्मचारी आहे. तर त्याची पत्नी ही वणीत भीमनगर येथे राहते. 23 सप्टेंबर रोजी 4 ते 5 दिवसांसाठी त्याची पत्नी ही पतीकडे गोंडपिंपरीला गेली होती. त्यामुळे घराला कुलूप होते. चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला

चोरट्यांनी कपाटात ठेऊन असलेले दीड लाख रुपयांचे दागिने ज्यामध्ये सोन्याची पोत, अंगठी व 7 हजार रुपये नगदी चोरून नेले. असे अमोलचे म्हणणे आहे. एकाच रात्री एकाच परिसरात दोन ठिकाणी चोरी झाल्याने वणीत चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. यांच्या लवकरच मुसक्या आवळल्या नाही तर पुन्हा अशा घटना होणार असल्याची भीती वणीकर बोलून दाखवत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.