आमदारांपाठोपाठ पंचायत समितीचे सभापतीदेखील पॉझिटीव्ह

सोशल मीडियावरून संजय पिंपळशेंडे यांनी दिली माहिती

0 11

जब्बार चिनी, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार नुकतेच कोरोना पॉझिटीव्ह आलेत. त्यांच्यापाठोपाठ भाजपाचे नेते संजय पिंपळशेंडेदेखील कोरोना पॉझिटीव्ह आलेत. पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे यांनी सोशल मीडियावर तशी माहिती दिली. त्यांच्या चाचणीनुसार ते पॉझिटीव्ह आल्याचं त्यांनी जाहीर केलं.

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे यांनी सोशल मीडियावरून एक विनंती केली. त्यानुसार त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोनासंदर्भात जे प्रोटोकॉल असतील त्यांचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं असंही त्यांनी म्हटलं आहे. सामाजिक, राजकीय आणि सर्वच क्षेत्रांतील व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह निघत आहेत. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी ही विनंती केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.