पसार झालेला चोरटा वणी पोलिसांच्या जाळ्यात

गेल्या चार महिन्यांपासून पोलिसाच्या हातावर तुरी देऊन चोरटा फरार

0 927
वणी: चोरीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या चोरट्याच्या वणी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. गुड्डू उर्फ शाहरुख असलम शेख असं या चोरट्याचं नाव आहे. एका चोरीच्या गुन्ह्यात तो पसार झाला होता. चार महिन्यांपासून माजरी पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला वणीतील प्रेमनगर परिसरातून अटक करण्यात आली आहे.

 

सविस्तर घटना अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी पोलीस ठाण्यात दोन चोरीच्या गुन्ह्यात तीन आरोपी फरार होते. चार महिन्यांआधी वणीतील रुपम कलेक्शन या कापड दुकानासमोर हे तिघं संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतलं, तर एक जण पसार होण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेण्यात आलेले माजरी येथील चोरी प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र त्यातला एक जण पसार होण्यात यशस्वी झाला होता. तेव्हा पासून पोलीस गुड्डू उर्फ शाहरुख असलम शेख याचा शोध घेत होते.

मंगळवारी पसार झालेला गुड्डू उर्फ शाहरुख असलम शेख हा शहरातील प्रेमनगर (वारांगणा) वस्तीत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली.  त्यांनी तिथून गुड्डूला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याच्या खिशातून १५ हजार रुपये किमतीचे कानातील डुल हस्तगत केले.

(पाटाळा पुलावरील अपघातातील ताबिश नदीत की विदेशात ?)

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने,ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, शेख नफिस,सुनील खंडागळे,सुधीर पांडे, उल्हास कुरकुटे, दिलीप जाधव यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.