विजेच्या शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

0 1,326

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापुर)  येथील शेतकरी संजय विश्वनाथ गोरे (47)  यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी 27 जून ला संध्याकाळी 6:45 च्या दरम्यान घडली.

बुधवारी संध्याकाळी  मुकुटबन सह मांगली (हिरापूर) परिसरात पाऊस झाला. संजय संध्याकाळी शेतातून घरी परत आला. त्यावेळी संजयला त्याचे घर गळत असल्याचे दिसले. गळत असलेला टिनपत्राला एमसील लावण्यासाठी तो घराच्या छतावर चढला. त्याचवेळी अचानक विद्युत प्रवाह टिनपत्र्यामध्ये आला. विजेचा शॉक लागल्याने तो खाली कोसळला व जागीच मृत्यू झाला.

ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्याला मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचे शव शवविच्छेदनाकरिता वणी येथे पाठविण्यात आले. संजयच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.