छोरीया ले आऊटमधील फ्लॅटमध्ये भीषण आग

रात्री 8.30 वाजताच्या दरम्यानची घटना, मोठा अनर्थ टळला

0 14

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर जवळील छोरिया ले आउटमधील साई निवास अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी यात लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान ही आग लागली.

गणेशपूर येथील छोरिया ले आऊट येथील पाण्याच्या टाकीजवळ ब्लॅक डायमंड स्कूल जवळ साई निवास अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये तिस-या माळ्यावर आकाश शर्मा हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. रात्री 8.15 वाजताच्या दरम्यान ते जेवण करून घराबाहेर शतपावलीसाठी गेले होते. थोड्या वेळाने ते परत आले.

ते फ्लॅटसमोर गेले असता त्यांच्या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात आगीचे लोंढे बाहेर येताना दिसले. त्यांनी लगेच याबाबत अग्निशामन दलाला माहिती दिली. अग्निशामन दल तातडीने घटनास्थळी पोहोचली ब-याच वेळानंतर त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीचे कारण काय?
घरमालकाच्या म्हणण्यानुसार रात्री ते जेवणानंतर त्यांनी देवासमोर दिवा लावला होता. दिवाबत्तीनंतर ते फिरायला गेले होते. त्या दिव्यामुळे कदाचित आग लागली असावी असा त्यांचा अंदाज आहे. आग लागली त्यावेळी घरात सिलिंडर होते. मात्र अग्निशामक दल तात्काळ पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराची वित्त हानी झाली आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात 7 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्येचा दर आला 1.5 टक्यांवर

हिमांशुजी बतरा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.