कॉलेज तरुणाचा धरण परिसरातील झुडुपात आढळला मृतदेह

नवरगाव धरण परिसरातील घटना, आत्महत्या केल्याचा अंदाज

8

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणाजवळ एका कॉलेज तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेहा शेजारी विषारी औषध आढळल्याने तरुणाने विष प्राषन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. प्रज्योत भीमराव मून (21) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्रज्योत हा रासा येथील रहिवासी होता. तो मारेगाव येथील एका कॉलेजात शिक्षण घेत होता. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास तो एका मित्राची दुचाकी घेऊन नवरगाव धरण परिसरात गेला होता. आज बुधवारी दिनांक 27 मार्च रोजी सकाळच्या सुमारास काही लोकांना नवरगाव धरण परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळला. याची त्वरित माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी पोहोचली असता त्यांना तिथे मोबाईल, एक दुचाकी, स्कूल बॅग, मोबाईल व कीटकनाशक आढळले. पोलिसांनी ओळख काढली असता सदर तरुणाचे नाव व गाव समोर आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रकरणाचा मारेगाव पोलीस तपास करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.