भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

कोलार पिपरी येथील घटना

0 15

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास एक महिला ही शेताकडे जात असताना तिच्या गळ्यातून एका चोरट्याने मंगळसूत्र पळविले. हा चोरटा एका विना क्रमांकाच्या दुचाकीवर आला होता. ही घटना कोलार पिपरी येथील एका कच्च्या रस्त्यावर घडली.

संध्या शामदेव ठमसक रा. वणी ही महिला 27 जानेवारीला सकाळी कोलार पिपरी येथील खाडे यांच्या शेतात कामसाठी निघाली. कोलार पिपरी येथील व्ही पॉईंट जवळ एक इसम सिल्वर कलरच्या दुचाकीवर थांबून असल्याचे दिसून आले. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. या इसमास महिला ही फक्त नावाने ओळखत होती. परंतु पूर्ण नाव व चांगली ओळख नसल्याने तिने कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

त्याने तिला दुचाकीवर बसण्यास सांगितले. नकार देताच तो जवळ येऊन त्याने संध्याच्या गळ्यातील मंगळसूत्र अंदाजे किंमत 12 हजार रुपये हिसकावून घेतले. व घटनास्थळावरून पसार झाला. महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी सचिन याच्याविरुद्ध कलम 492 नुसार गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा पुढील तपास पोऊनी गोपाल जाधव करीत आहे.

हे देखील वाचा:

एसीवर 40 टक्यांपर्यंतची सूट, ऑफर केवळ रविवार पर्यंत

वणी तहसील कार्यालयात कामबंद आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.