चोरट्यांनी उडवली महिलेच्या खांद्यावरची पर्स, मोबाईल व रोख रक्कम लंपास

पर्सचे दोन्ही कसे कापून पर्स उडवली, चोरट्यांच्या टारगेटवर आता महिला

29

विवेक तोटेवार, वणी: रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वणीतील जटाशंकर चौकातून भाजी घेताना एका महिलेची चोरट्याने पर्स पळवली. महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रक्षधासीमा इकबाल शेख या पंचशील नगर येथे राहतात. रविवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी त्या काही सामान खरेदी करण्याकरिता मुख्य बाजारात गेल्या होत्या. जटाशंकर चौकात त्यांनी मिठाई खरेदी केली व त्या भाजी घेण्याकरिता थांबल्या. भाजी घेऊन झाल्यावर पैसे देण्याकरिता त्यांनी खांद्यावर अडकवून ठेवलेली पर्स बघितली असता त्यांना पर्स आढळून आली नाही.

पर्सचे दोन्ही कसे कापून पर्स कुणीतरी चोरून नेल्याचे त्यांना समजले. पर्समध्ये मोबाईल व 10 हजार रुपये नगदी होते. त्यांनी त्वरित आपल्या पतीला याबाबत माहिती दिली. शेवटी दोघांनीही वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी ठाण्याचे जगदीश बोरनारे करीत आहे.

याअगोदर दोन दिवसांपूर्वी वणी बसस्थानकावरून एका महिलेचा गळ्यातून मंगळसूत्र चोरी गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. परंतु पोलिसांना अजूनही चोर गवसलेला नाही. एकीकडे चोरीच्या घटना कमी होत नसताना दुसरीकडे चोरट्यांनी आपला मोर्चा महिलांकडे वळवला आहे.  त्यामुळे आता महिलाही सुरक्षीत राहिलेल्या नाहीत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.