खडकी फाट्याजवळ ऑटो पलटी, 12 मजूर जखमी

कुत्रा आडवा आल्याने सुटले चालकाचे नियंत्रण, 6 जण गंभीर

25

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील खडकी फाट्याजवळ एका ऑटोला भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जण जखमी झाले. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सदर मजूर हे शिवनाळा येथील आहेत. जखमी मजुरातील 6 मजुरांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. 

सविस्तर वृत्त असे की सकाळच्या सुमारास शिवनाळा येथील काही मजूर एका ऑटोने गोधनी येथे शेतीच्या कामासाठी जातात. आज दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास गावातील 11 महिला व एक पुरुष मजूर ऑटोने गोधनीला जात होते. दरम्यान सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास खडकी फाट्याजवळ एक कुत्रा अचानक ऑटो समोर आला. त्यामुळे चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले व ऑटो पलटी झाला.

या अपघातात 11 महिला मजूर व एक पुरुष मजूर जखमी झालेत. अपघात होताच घटनास्थळावरील नागरिकांनी जखमींना तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ व नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.