मारेगावात शहिद दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली

0 457

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील जिजाऊ चौकात मारेगावातील नागरिकांच्या वतीने २६/११ शहिद दिना निमित्त आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता मार्डी रोड स्थित जिजाऊ चौकात शहरातील नागरिकांनी मुंबई येथे अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या पोलिसांना आणि जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मेनबत्ती प्रज्वलीत करण्यात आल्या होत्या.

या श्रद्धांजली कार्यक्रमात मारेगावचे तहसीलदार विजय साळवे, मारेगाव पो.स्टे.चे ठाणेदार अमोल माळवे, ए.पी.आय. नागरगोजे, विप्लव ताकसांडे, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, नवीन गिरी, साबण गिरी, विशाल परचाके व मोठ्या संख्येने मारेगाववासी उपस्थित होते.

खाली क्लिक करून पाहा कार्यक्रमाचा व्हिडीओ….

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.