नवीन लालगुडा येथे 17 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

दुपारी 1.30 वाजता उघडकीस आली घटना

13

विवेक तोटेवार, वणी: रजा नगर जवळील नवीन लालगुडा येथे राहत असलेल्या गणेश विजय पेरकावार (17) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

गणेश हा शिक्षण घेत होता. त्याचे आई वडील हे मोलमजुरी करून 2 मुले आणि 2 मुलींचा उदरनिर्वाह करतात. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्याचे आईवडील हे कामासाठी घरून निघाले होते. त्यानंतर गणेश घरी एकटाच होता. दरम्यान गणेशने टिनाच्या घराच्या छतावरील लाकडी फाट्याला गळफास घेतला.

1.30 वाजताच्या सुमारास गणेशच्या वडिलांना त्यांच्या भाच्याचा कॉल आला. भाच्याने त्यांना गणेशने आत्महत्या केल्याची माहिती दिली. विजय हे तातडीने घरी गेले असता त्यांना तिथे गणेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

गणेशला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. गणेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

ब्राह्मणी रोडवर खड्यात दुचाकी आदळून अपघात

वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन, काही काळ वाहतूक विस्कळीत

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.