शुक्रवारी सकाळी वणीत मॅराथॉन स्पर्धा

शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

0 529

विवेक तोटेवार, वणी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीमध्ये शुक्रवारी मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी तालुका व शहर शिवसेनेद्वारा ही मँराथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वणी येथून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

ही स्पर्धा खुली आणि 16 वर्ष आतील वयोगटात घेण्यात येत आहे. खुल्या गटात पुरुष आणि महिला गट आहे. तर 16 वर्षांआतील गटातही मुले व मुली असा गट आहे. प्रत्येक गटातील विजेत्याला अनुक्रमे 2 हजार रुपये, 1 हजार रुपये व 500 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला एक टी शर्ट देण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह, उपजिल्हाप्रमुख दिपक कोकास, तालुका प्रमुख गणपत लेडांगे, शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.