वणी पंचायत समिती तर्फे सामाजिक न्याय दिन साजरा

0 570

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त समता दिंडी काढून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.

 

येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या पटांगणावरून निघालेल्या दिंडीला पंचायत समिती सभापती लिशा विधाते यांनी सुरुवात करून दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, गजानन विधाते, गटविकास अधिकारी राजेश गायनर, सहा. गटविकास अधिकारी धनपाल कोसे, गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

येथील सर्व शाळांच्या सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्यायाचा संदेश देत शहरातील प्रमुख मार्गानी फिरून जिल्हा परिषद शाळेत समारोप झाला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश नगराळे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बंडूभाऊ चांदेकर यांनी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेश गायनर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून छ. शाहू महाराजांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक रामदास कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुरेश पाझारे, माया दिवेकर यांनी परिश्रम घेतले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.