आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण, गुरुनगर येथे 2 रुग्ण

अद्याप 932 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी

0 13

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील गंगा विहार येथे एक तर गुरुनगर येथे दोन रुग्ण आढळून आलेत. तर चिखलगाव येथे 2 राजूर कॉलरी येथे 1 तर दिग्रस तालुक्यातील 2 व्यक्ती वणीत पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यात कोरोनामुळे 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुक्रवारी दिनांक 26 मार्च रोजी 42 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 8 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 34 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 143 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 932 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 8 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 50 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 13 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 22 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 15 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1401 रुग्ण आढळून आलेत. यातील 1325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

आज जिल्ह्यात 7 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
गेल्या 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने 7 रुग्णांचा मृत्यू झाला तर 458 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 58, 90, 67, 68, 62 वर्षीय पुरुष आणि 62 आणि 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज पॉजिटिव्ह आलेल्या 458 जणांमध्ये 312 पुरुष आणि 146 महिला आहेत.

हे देखील वाचा:

मारेगावात पुन्हा 2 पॉझिटिव्ह, तालुक्यात 19 ऍक्टिव्ह रुग्ण

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या 7 जणांना अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.