आज शहरात कोरोनाचे 2 रुग्ण

58 व्यक्तींवर लॉकडाऊनचे नियम तोडल्याने कारवाई

0 13

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. हे दोन्ही रुग्ण चिखलगाव येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 31 आहेत. दरम्यान कोरनाचा वाढू नये यासाठी प्रशासनाने कारवाईत वाढ केली आहे. आज तब्बल 58 व्यक्तींवर मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंग न ठेवल्याने दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान शनिवार संध्याकाळी 5 वाजे पासून सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदी लागू होणार आहे.

आज 12 संशयीतांच्या रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. यात 2 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 10 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आजच्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 31 झाले आहेत. यातील 9 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 8 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 14 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

आज आलेल्या रुग्णांवरून 69 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज एकही अहवाल प्राप्त झालेला नाही. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1230 रुग्ण आढळून आलेत. यातील 1174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज 58 व्यक्तींवर कारवाई
लॉकडाऊनचे नियम तोडणा-यांवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. आज 58 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 13 व्यक्तींवर मास्क न वापरल्याने तर 45 व्यक्तींवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने कारवाई करण्यात आली. यात मास्क न लावणा-यांना प्रत्येकी 500 रुपये तर असा 6500 रुपये तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणा-यां 45 जणांकडून प्रत्येकी 200 रुपये असा 9000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आज एकूण 15500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हे देखील वाचा:

सेक्स रॅकेटच्या संशयावरून नागरिकांची धाड

ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघात, दोन जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.