वरोरा बायपास रेल्वे क्रॉसिंग जवळ सापडला मृतदेह 

दुचाकी स्लिप होऊन खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज 

62

विवेक तोटेवार, वणी : बुधवार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास चिखलगाव वरून जाणा-या वरोरा बायपास वरील रेल्वे क्रॉसिंग जवळ एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे. जगदीश नारायण बलकी (38) रा. लाखापूर ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकी स्लिप होऊन खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी रेल्वे गेट किपरला रेल्वे रुळाच्या बाजूला झाडा झुडपात असलेल्या खड्ड्यात एक मोटरसायकल व इसम पडून दिसला. त्यांनी ही माहिती वणी पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला व घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे

प्राथमिक तपासानुसार जगदीश हा आपल्या दुचाकीने (MH 29 BR 0401) वणीला आला होता. डिक्कीत आढळलेल्या फुलांवरून त्यांनी वणीत दस-या निमित्त पूजेसाठी फुलं घेतले व ते लाखापूर या आपल्या गावाकडे परत जात होते. परंतु वाटेतच त्याचा अपघात झाला. गंभीर अवस्थेत ते रात्रभर तिथे पडून होते व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

मृतक जगदीश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यांच्या मागे वडील, पत्नी, भाऊ व 3 मुली असल्याची महिती आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.