मोबाईल चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विठ्ठलदास देवचंद दुकान फोडणारे गजाआड

0 937

विवेक तोटेवार, वणी: 15 दिवसात दोनदा गांधी चौकातील दुकान फोडून मोबाईल लंपास करण्यात आले होते. त्या चोरट्याना वणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहे. तर एक युवक आहे.

जोबनपुत्रा याचे गांधी चौकात विठ्ठलदास देवचंद नामक दुकान आहे. 15 दिवसांआधी चोरट्यांनी हे दुकान फोडून या दुकानातून सुमारे 10 लाखांच्या मोबाईलची चोरी केली होती. त्यानंतर पुन्हा 7 दिवसात त्याच दुकानात 7 लाख रुपयांचे मोबाईल दुकानाचे समोरून कुलूप तोडून चोरण्यात आले.

याबाबत पोलिसांना सुगावा लागला. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी त्वरित डी बी पथकास पाचारण केले. डी बी पथकाने शास्त्रीनगर येथून एकास अटक केली. त्यानंतर त्या विधिसंघर्ष बालकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सेवानगर येथून एकास अटक केली. तर तिसऱ्या आरोपीला शास्त्रीनगर येथून अटक करण्यात आली.

शास्त्रीनगर येथून अटक करण्यात आलेल्या सैय्यद शाहरुख सैय्यद पठाण (25) याच्याकडून फक्त एकच सॅमसंग कंपनीचा मोबाईलची हस्तगत करण्यात आला आहे. चोरी केलेले इतर मोबाईल कुणास विकले याबाबत माहिती अजूनही मिळू शकली नाही.

या तिघांव्यतिरिक्त एक आरोपी फरार असल्याची माहिती पो ऊ नि हिवसे यांनी वणी बहुगुणीशी बोलतांना दिली. पोलिसांनी न्यायालयात 8 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ऊ नि हिवसे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.