राजूर येथील मटका पट्टीवर पोलिसांची धाड

एका आरोपीला अटक तर इतर घटनास्थळावरून पसार

10

विवेक तोटेवार, वणी: बुधवार 24 ऑगस्ट रोजी 4 वाजताच्या सुमारास राजूर येथील मटकापट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यात एका आरोपीला अटक करण्यात आली. तर इतर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. बुधवार 24 ऑगस्ट रोजी पोलिसांनी राजूर येथे काही इसम मटका घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीवरून विशाल गेडाम, सुहास मंदावार, पुरुषोत्तम दडमल यांनी राजूर येथील भगतसिंग चौक असलेल्या एका मटका पट्टीवर गेले असता तिथे काही इसम मटका जुगार घेताना दिसून आले. पोलिसांनी धाड टाकून एक आरोपी रितेश रमेश इग्रपवार (34) याला अटक केली. झडती घेतली असता त्याच्याकडून कागद पेन व 2140 रुपये नगदी मिळून आले. त्याच्यावर कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. वणी व परिसरात चालणारे अवैध व्यवसाय समुळ नष्ट करावे अशी अपेक्षा परिसरातून व्यक्त केली जात आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.