आज वणीत कोरोनाचे 7 रुग्ण

कोरोनाचे तांडव सुरूच.... एकूण रुग्णसंख्या 121...

0 9

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी वणीत कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आले. आज निष्पन्न झालेल्या रुग्णांमध्ये 3 व्यक्ती या आरटी पीसीआर (स्वॅब) टेस्ट मधून तर 4 व्यक्ती या रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आल्या आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमुळे वणी तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 121 झाली आहे.

यवमताळ येथून 75 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी होते. त्यातील 20 रिपोर्ट आज प्राप्त झाले. त्यातील 3 रुग्ण व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर 33 व्यक्तींच्या रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या त्यातील 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आल्या आहेत. आज 25 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे तर अद्याप 80 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

आज वणी तालुक्यात एकूण 7 रुग्ण आढळल्याने पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या ही 121 झाली आहे. यातील 59 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 60 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील कोविड केअर सेंटरमध्ये 54 व्यक्तींवर उपचार सुरु आहेत तर 06 व्यक्तींवर यवतमाळ जीएमसी येथे उपचार सुरू आहे. सध्या तालु्क्यात 17 कन्टेन्मेंट झोन असून यातील 10 शहरी भागात तर 7 ग्रामीण भागात आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.