विवेक तोटेवार, वणी: रंगकाम करताना एका मजुराचा तिस-या माळ्यावरून खाली कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास छोरीया ले आऊय येथे ही घटना घडली. बंडू तुकाराम खोब्रागडे (50) रा. रंगारी पुरा, वणी असे मृतकाचे नाव आहे. ते मजुरी व रंगकामाचे काम करतात. आज गुरुवारी दिनांक 25 जुलै रोजी ते छोरीया ले आऊट येथील विनायक अपार्टमेंट येथे रंगकामाला गेले होते. दुपारी 1 वाजताच्या सुमारास रंगकाम करताना त्यांचा तोल गेला व ते तिस-या माळ्यावरून खाली कोसळले. त्यांच्या सहका-यांनी याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. त्यांच्या सहका-यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत त्यांच्या मृत्यूची नोंद केली. त्यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. बंडू यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.