मारेगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

कुंभा येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह, परिसरात दहशत

0 2,052

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मारेगाव तालुक्यातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे कोरोनाने आता मारेगाव तालुक्यात शिरकाव केला आहे. ही व्यक्ती राजूर येथील व्यक्तींच्या संपर्कात आली होती. बुधवारी त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 14 व्यक्तींना मारेगाव येथे कॉरन्टाईन करण्यात आले होते. गुरुवारी या सर्व व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ य़ेथे पाठवण्यात आले होते. त्याचा आज रिपोर्ट आला असून त्यात कुंभा येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

राजुर (कॉलरी) येथील एका 35 वर्षीय महिलेवर हृद्यरोगासंबंधी वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. डॉक्टरांनी त्या महिलेला शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान कुंभा येथील एक दाम्पत्य या महिलेच्या सेवेसाठी राजुर येथे थांबले होते. दरम्यान रुग्णाच्या शस्त्रक्रियेपूर्वी त्या महिलेची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात ती महिला पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे कुंभा येथील त्या दाम्पत्यासह आणखी एक पुरुष असे 3 व्यक्ती व नेत (वरुड) येथील संपर्कात आलेले 11 व्यक्ती अशा 14 व्यक्तींना मारेगाव येथील चिंधुजी पुरके आश्रम शाळेत कॉरन्टाईन करण्यात आले आहे. आज या 14 व्यक्तींचा रिपोर्ट आला. यात 13 व्यक्ती निगेटिव्ह तर कुंभा येथील एक व्यक्ती पॉजिटिव्ह आली आहे.

ग्रामीण भागात दहशत
आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण शहरात आढळून येत होते. मात्र आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. त्यामुळे खेडोपाडी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जी व्यक्ती पॉजिटिव्ह आढळली आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात जी व्यक्ती आली त्यांना ट्रेस करण्यास सुरूवात झाली असून त्यांच्या घराचा परिसर सिल करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.