गुणवंत विद्यार्थी गौरव व मार्गदर्शन सोहळा

धनोजे कुणबी समाज विकास बहु. संस्थेचे आयोजन

0 522

बहुगुणी डेस्क, वणी: धनोजे कुणबी समाज विकास बहु. संस्थेने ” गुणवंत विद्यार्थी सत्कार व मार्गदर्शन सोहळा घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील कातकडे, उद्घाटक आ. बाळू धानोरकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते तात्यासाहेब मोरे, तसेच विजय मुसळे, प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना बोदाडकर, गोविंद थेरे, वामनराव कूचनकर, विनायक बोढाले, हे मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी मुख्याधिकारी निकिता ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन करताना आमदार बाळू धानोरकर

या कार्यक्रमाची सुरुवात समाज भवनाचे अध्यक्ष माजी आमदार स्व. बापूराव पानघाटे यांना श्रध्दांजली देऊन करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक मोरे यांनी विद्यार्थ्याना व पालकांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मुसळे, निकिता ठाकरे यांनी गुणवंतांना मार्गदर्शन केले. आ. बाळू धानोरकर व सुनील कातकडे यांनीदेखील समाजाबद्दल आपली मते मांडली व विद्यार्थीना योग्य मार्गदर्शन केले. नंतर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र खरवडे, प्रास्ताविक विकास जेणेकर व आभार प्रदर्शन विकास देवतळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेच्या सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.