पुरड येथील शेतक-याची विष प्राशन करून आत्महत्या

15

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील पुरड येथील एका शेतक-याने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संभाजी यादव बदखल (50) असे मृतकाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

संभाजी बदखल हे पुरड (नेरड) येथील रहिवासी होते. ते शेती करायचे. आज दिनांक 25 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांच्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. काही वेळातच त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने संभाजी यांना शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला.

संभाजी यांच्या कुटुंबीयांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्या आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे. संभाजी यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.