दुचाकी चोरट्यास वणी पोलिसांनी केली अटक

डीबी पथकाची कारवाई

0 16

विवेक तोटेवार, वणी: 16 जानेवारी रोजी वणीच्या दीपक चौपाटी परिसरातून एक दुचाकी चोरीसा गेली होती. याबाबतची तक्रार दुचाकी मालकाने वणी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलोसांनी शोध घेत बुधवारी 24 फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरट्यास अटक केली.

16 जानेवारी रोजी शिरपूर येथे राहणाऱ्या प्रकाश बापूराव नागतुरे (28) यांची होंडा कंपनीची दुचाकी (MH35 AN2042) दीपक चौपाटी वरून चोरी गेली होती. याबाबत त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली. वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा नोंद केला होता. तेव्हापासून वणी पोलीस आरोपीचा शोध घेत होते.

24 फेब्रुवारी रोजी वणीतील शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या युवकाकडे सदर दुचाकी दिसून आली. डीबी पथकाने त्वरित कारवाई करीत आरोपी अंकुश ईश्वर देठे (20) रा. रंगनाथनगर याला अटक करून दुचाकी ताब्यात घेतली.

सदर कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पोऊनी गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार यांनी केली.

हे देखील वाचा:

बुधवारी कोरोनाचे 5 रुग्ण, चिखलगावात कोरोनाचा उद्रेक

‘तिला’ झाली गर्भधारणा, तरीही ‘तो’ लग्न करेना

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.