कान्हाळगाव (वाई) येथे महिलेची आत्महत्या

मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच

11

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) येथे राहणाऱ्या महिला विमल सीताराम कुडमेथे वय अंदाजे 58 या महिलेने मंगळवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. मात्र याकडे अद्यापही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. 

सविस्तर वृत्त असे की विमल सीताराम कुडमेथे ही महिला कान्हाळगाव येथील रहिवाशी होत्या. त्या शेतमजुरी करायच्या. मंगळवारी रात्री त्या घरातून निघून गेल्या होत्या. पहाटेच्या सुमारास त्या घरात न दिसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी विमल यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान गावालगत तुळशीराम मेश्राम यांचे शेत आहे. सकाळी 5 वाजताच्या सुमारास ते शेतात गेले असता त्यांना विहिरीत एक मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती पोलीस पाटलांना दिली. तर दुसरीकडे विमल यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. ते घटनास्थळी पोहोचले असता त्यांना विहिरीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली.

घटनेची माहिती मारेगाव पोलीस ठाण्यात मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे विमल यांच्या पश्चात पती, मुलगा असा आप्तपरिवार आहे.

हे देखील वाचा:

ट्रॅक्टरखाली दबून मजूराचा मृत्यू तर चालक जखमी

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे वारंवार शोषण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.