श्री रंगनाथ स्वामी मंदिरात 25 नोव्हेंबरला वैकुंठ महोत्सव

रंगणार विविध कार्यक्रम, भव्य दीपोत्सवाचे आयोजन

94

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्थानिक सुप्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिरात शनिवार दि. २५ नोव्हेंबर  २०२३ रोजी वैकुंठ चतुर्दशी निमित्त वैकुंठ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता रंगनाथ स्वामींच्या मूर्तीला महाअभिषेक करून या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

दुपारी १ ते२ ब्रह्मांडनायक गजानन महाराज उपासना मंडळ वणी द्वारा सामुहिक उपासना होणार आहे, दुपारी २ ते ४ विजय चोरडीया द्वारा महाप्रसाद , दुपारी ४ ते ७ ह.भ.प.

मनुमहाराज तुगनायत संच द्वारा विष्णुसहस्रनामावली पठन व  भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायं ७ ते ८ यज्ञ सेवा समिती द्वारा सामुहिक श्री सुक्त हवन, रात्री ८ ते ९ धार्मिक देखावे (झांकीया) होणार आहे. 

भव्य दीपोत्सवाचे आयोजन
कार्यक्रमांची सांगता रात्री ९ ते १२ दीपोत्सव, हरिहर मिलन, ब्रह्मोत्सव, छप्पन भोग व महा आरतीने होईल. हरिहर मिलन कार्यक्रमाचे पौरोहित्य हिंगनघाट येथील पं.गोविंद महाराज जोशी करणार आहेत. सोबत वाद्यवृंदा सहित दक्षिण भारतातील वेदशास्त्रसंपन्न पंडित राहतील.  

या कार्यक्रमाला भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे व आपल्या घरुन छप्पन भोग करिता २५० ग्रॅम मिठाई आणावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे.  

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.