व्यायामशाळेच्या विकासासाठी सरसावले संजय खाडे

नृसिंह व्यायाम शाळेच्या विकासासाठी 21 हजारांची देणगी

116

 

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील नृसिंह व्यायाम शाळेत दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री रंगनाथ स्वामी अर्बन निधी वणीचे अध्यक्ष संजय खाडे व त्यांचे चिरंजीव धनंजय खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यायाम शाळेच्या विकासासाठी संजय खाडे यांच्यातर्फे 21 हजारांची मदत करण्यात आली. 

कार्यक्रमात नृसिंह व्यायाम शाळेच्या लाठीकाठी व कबड्डी चमुनी पुष्पगुच्छ देऊन संजय खाडे व धनंजय खाडे यांचा सन्मान केला. याप्रसंगी विचार व्यक्त करताना संजय खाडे म्हणाले की नृसिंह व्यायाम शाळा फार जुनी असून या संस्थेने अनेक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवले आहे. व्यायाम शाळा ही आरोग्य हीच धन संपदा आहे. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ असते. तरच आपण सर्वच क्षेत्रात काम करू शकतो असे मनोगत व्यक्त केले. 

यावेळी नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, सचिव पुरुषोत्तम आक्केवार, सहसचिव पांडुरंग ताटेवार, कोषाध्यक्ष रमेश उगले, संचालक दिलीप येमुलवार, रमेश शर्मा, विलास आसुटकर, सूर्यकांत मोरे, कन्हैया पारखी, नरसिंह भाई पटेल, इब्बू शेख, मुन्नाभाई शेख, राजकुमार मोरे, प्रेम मेश्राम, देवा राठोड, कुणाल ठोंबरे, यश काकडे, सुजल गाडगे, फैय्याज अली, सय्यद समीर, बंडू निंदेकर, वैष्णवी चामुलवार, 

कु आयु उगले, अण्वि इंगोले, गौरी पिदूरकार, संकेत आक्केवार, सागर डोंगरे, समीर सय्यद, कु छकुली वाढई, राज जमदाडे, डॅनिश पठाण, दुशांत आवारी, माई बोढे, श्रावणी आवारी, डिंपल बदखल, काजल गाडगे, शीतल आडे, बोढे, दोडके उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे आभार सूर्यकांत मोरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नृसिंह व्यायाम शाळेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.