अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचारी ठार

पांढरकवड्याला जाताना घडली घटना

0 862

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणीवरून गावाकडे जात असताना तालुक्यातील खडकी बुरांडा दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात बँक कर्मचारी ठार झाला. मंगळवारी 23 ऑक्टोबरच्या रात्री 8.00 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस सूत्रानुसार वणी येथील पुसद अर्बन बँकेत विनोद विठ्ठल यलकुंचवार हे चतुर्थ कर्मचारी म्हणून नोकरी करतात. मंगळवारी रात्री ते त्याची दुचाकी (एमएच 29 y-3639) ने पांढरकवड्याला जात होते. खडकी जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांच्या डोक्याला व गळ्याला गंभीर मार लागल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरने दिली.

या घटनेत अज्ञात वाहनावर कलम 279, 304(अ) भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची फिर्याद मृतकाचे भाऊ मयूर यलकुंचलवार यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनात जमादार वेट्टी करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.