अज्ञात इसमाचा मृतदेह नदी पात्रात आढळला

पुराच्या पाण्यात मृतदेह वाहून आल्याचा अंदाज 

11

विवेक तोटेवार, वणी : वणी पोलीस स्टेशन अंतर्गत झोला गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शनिवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेबाबत वडगाव येथील पोलीस पाटील यांनी  वणी पोलीस स्टेशनला माहिती दिली.   

माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नदीपात्रात अंदाजे 45 वर्ष वयाच्या एका पुरुषाचा मृतदेह पडून होता. त्याच्या उजव्या हाताचा पंजा नव्हता. या मृतदेहाचे शरीर पूर्णपणे फुगलेले होते.  मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून सदर मृतदेह हा पाण्यात वाहून आल्याचा अंदाज आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.