अखेर बेपत्ता इसमाचा नाल्यात आढळला मृतदेह

भालर रोडवर नाल्यात आढळला मृतदेह

8

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या एका 50 वर्षीय इसमाचा अखेर भालर रोडवरील एका नाल्यात मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शहरातील शास्त्रीनगर येथे वास्तव्यास असलेले मारोती जयवंत कुचेवार हे गुरूवारी सकाळी घरून निघून गेले होते. तेव्हापासून त्यांचा शोध घेतला जात होता. अशातच शुक्रवारी 23 ऑगस्टला सकाळी त्यांचा मृतदेहच आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर पाठविला. मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मारोती कुचेवार हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास वणी पोलिस करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.