झरी तालुक्यात फडणविसांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

आमदार बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

0 271

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी वृक्षारोपण तसचे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

दुपारी खरेदी विक्री संघ कार्यालयाच्या आवारात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष चक्रधर तीर्थंगिरीकर, उपाध्यक्ष प्रवीण विधाते, पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी सुद्धा वृक्षारोपण केले. कार्यक्रमा दरम्यान आमदार बोदकुरवार यांनी शासकीय रुग्णालय व खरेदी विक्री संघाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या.

त्यानंतर पोलीस स्टेशन व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व गावकऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सतीश नाकले, पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार, चक्रधर तिर्थगिरीकर, प्रवीण विधाते, लता आत्राम, कुश केमेकर, ठाणेदार धर्मा सोनुले, अशोकरेड्डी बोदकुरवार, सोनुने, राम आईटवार, सुरेश मानकर, संजय दातरकर, किशोर चव्हाण, बंडू वराटे, अनिल पोटे, सचिन दुम्मनवार, प्रकाश गोंगलवार, रमेश उदकवार यांच्यासह भाजप कार्यकर्ते व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.