मोहदा येथे गिट्टी खाणीत युवकाचा कुजलेला मृतदेह आढळला

0 865

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहदा येथे पाण्याने तुडुंब भरलेल्या गिट्टी खाणीमध्ये एका अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबल माजली आहे. मोहदा कृष्णानपूर मार्गावरील बंद पडलेल्या या गिट्टी खाणीमध्ये मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी भरले. त्यात असून एका गुरुख्याला युवकाचा विवस्त्र मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यावर त्यांनी गावकऱ्यांना याबाबत सूचना दिली.

गिट्टी खाणीमध्ये युवकाचा मृतदेह असल्याबाबतची माहिती मोहदा येथील नागरिकांनी शिरुपूर पोलीस स्टेशनला दिली. शिरुपूरचे ठाणेदार दीपक पवार, एएसआई मोदक, जमादार गावंडे, शेंडे हे घटनास्थळी पोहचले.पाण्यात तरंगत असलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यातून भयंकर दुर्गंध पसरली होती.

मृतदेह पाण्यातून बाहेर काढायला कुणीही तयार नव्हते. शेवटी पोलिस कर्मचाऱ्यांनीच मोहदा येथील काही युवकांच्या सहकार्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. आवारी यांना घटनास्थळी पाचारण करून घटनास्थळीच शवविच्छेदन केले.

मृतकाचे वय अंदाजे ३५ वर्ष असून तो भिकारी किंवा वेडसर व्यक्ती असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच सदर मृतदेह दोन ते तीन दिवसापासून पाण्यामध्ये पडून असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तर विवस्त्र अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाबाबत गावात उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.