चोरट्याने फोडले कृषी केंद्र

पेरणीच्या तोंडावर बि-बियाणांची चोरी

0 367
सुशील ओझा, झरी: झरी येथील लक्ष्मी कृषी केंद्रात 20 जुलैच्या रात्री दुकानामागील खिडकी तोडून बियाणे चोरून नेल्याची घटना घडली. प्रमोद मंचलवार असे फिर्यादीचे नाव आहे.
प्रमोद मंचलवार यांचे लक्ष्मी कृषी केंद्र नावाचे पोस्ट ऑफिसजवळ दुकान आहे. 21 जुलैला ते नेहमीप्रमाणे दिवसभर दुकानदारी करून संध्याकाळी घरी गेले. दुस-या दिवशी सकाळी ते दुकान उघडायला गेले असता त्यांना दुकानाजवळची खिडकी तोडलेली दिसली. त्यांनी दुकान उघडून पाहणी केली असता त्यांना बि-बियाणांची चोरी झाल्याचे लक्षात आले.
मंचलवार यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले आणि याबाबत तक्रार दिली. या चोरीत कपाशीचे 63 पाकीट, तुरीचे 9 पाकीट, ज्वारीचे 2 असे एकूण 73 पाकीट चोरीला गेले आहे. याची किंमत 48 हजार 740 आहे. या प्रकऱणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.