अल्पवयीन मुलीला सारखे मॅसेज करणे पडले महागात

आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

0 13

नागेश रायपुरे, मारेगाव: एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना तालुक्यातील करणवाडी येथे घडली. फिर्यादीच्या तक्रारी नुसार या प्रकरणी आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सूरज उर्फ आकाश संजय गायकवाड (23) असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.

माहिती नुसार आरोपी सूरज हा करणवाडीत राहतो. गावातच 15 वर्षीय अल्पवयीन पीडिता राहते. आरोपी पीडिताला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी तिच्या मोबाईलवर सारखा मॅसेज करायचा. तसेच तिचा नेहमी पाठलाग करूत जवळीकता साधण्याचा प्रयत्न करायचा. एक दिवस पीडितेच्या आईला सूरज हा तिच्या मुलीच्या मोबाईलवर सारखे मॅसेज करतो हे लक्षात आले.

याबाबत पीडितेच्या आईने मोबाईलवर सारखा मॅसेज करून विनयभंग केल्या प्रकरणी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. संशयित आरोपी सूरज गायकवाड विरोधात कलम भादंविच्या कलम 354 व कलम 12 (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास पो.उप.नि. अमोल चौधरी करित आहे.

हे देखील वाचा:

जेव्हा तिच्या सायकलीला बिबट्या क्रॉस करतो…

दिलासा… शहर होतेय कोरोनामुक्त, वणीत आजही अवघा 1 रुग्ण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.