सामाजिक उपक्रम राबवून संजय खाडे यांचा वाढदिवस साजरा

44

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सहकार क्षेत्रातील शहरातील सुपरिचित नाव असलेले संजय रामचंद्र खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी येथील वृद्धाश्रमात वृद्धांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमाला आर्थिक मदत म्हणून 10 हजारांची मदत देखील केली. यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुहास नांदेकर यांची उपस्थिती होती. संजय रामचंद्र खाडे हे सहकार व राजकीय क्षेत्रातील परिचित नाव असून ते रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड वणीचे अध्यक्ष आहेत तसेच ते वसंत जिनिंगचे संचालक देखील आहेत. परिसरातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.