वणीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, आरोपीही अल्पवयीन

0 2,283

विवेक तोटेवार, वणी: वणी येथे शुक्रवारी रात्री एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेऊन लॉकडाऊन असल्याने सूचनापत्रावर सोडण्यात आले आहे.

आरोपी व पीडिता एकाच परिसरात राहतात. शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास नळ आल्याने पीडिता ही पाणी भरण्याकरिता परिसरातील सार्वजनिक नळावर गेली. यावेळी आरोपीने तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. परंतु तिची काकू यावेळी आल्याने त्याला रागावून त्याला दूर केले. थोडा वेळाने पीडिता ही बकेट घेऊन बाथरूममध्ये गेल्यानंतर तो तिच्या मागे जाऊन पुन्हा तिचा विनयभंग केला.

यावेळी पीडितेने व तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार करण्याचे ठरवले. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर कलम 354 (A), (2) 35 A सहकलम पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याला सूचनापत्रावर सोडून दिले. लॉकडाऊन संपताच विधीसंघर्ष बालक याबाबतची जी काही गाईडलाईन आहे त्यानुसार पुढील चौकशी होईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.