भाजप युवामोर्चाने संजय राठोड यांना दाखविले काळे झेंडे

तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात यवतमाळ येथे आंदोलन

0 15

जितेंद्र कोठारी, वणी: पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागे वनमंत्री संजय राठोड हे जबाबदार असल्याचे आरोप करून भाजप युवामोर्चा कार्यकर्त्यांनी मंगळवारी संजय राठोड यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात यवतमाळ येथील लोहारा टी पवाईंटवर हे आंदोलन करण्यात आले.

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर मागील 15 दिवसांपासून अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी जनतेसमोर आले. बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र असलेले वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथून परत येत असताना संजय राठोड यांच्या ताफ्यातील वाहनांसमोर येऊन भाजयुमो कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून व घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

यावेळी पोलिसांनी भाजयुमो कार्यकर्त्यांना अडविण्याचे प्रयत्न केले. निषेध आंदोलनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हाध्यक्ष आकाश धुरट, मनीष गायकवाड, नितीन चहानकर, नितीन वासेकर आणि भाजयुमो कार्यकर्ता सहभागी झाले.

हे देखील वाचा:

मोबाईल टॉवरला गणेशपूर येथील रहिवाशांचा विरोध

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, आज 8 पॉजिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.