मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन आत्महत्या

आत्महत्यांच्या घटनांनी हादरला तालुका

1 11

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याला आत्महत्यांचे जणूकाही ग्रहणच लागले आहे. आज तालुक्यात पुन्हा आत्महत्येच्या दोन घटना घडल्यात. या आत्महत्या कोलगाव आणि देवाळा या गावांत झाल्यात.

यात पहिल्या घटनेत तालुक्यातील कोलगाव येथील किसन बापुजी सिडाम (65) यांनी कोलगाव शिवारातील आस्वले यांच्या शेतामध्ये सुबाभूळीला झाडाला गळाफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. किसन यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. किसनच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील देवाळा येथे 15 नोव्हेंबर रोजी मारोती माधव बोढे (47) यांनी स्वतः च्या शेतामध्ये विष प्राशन केले होते. दरम्यान त्यांना वणी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते.

परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना 22 नोव्हेंबरला सायंकाळी 6.30च्या सुमारास प्राणज्योत मालवली. मारोती यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा मोठा परिवार आहे.

हेदेखील वाचा

शाळेकडे फिरवली विद्यार्थ्यांनी पाठ, शाळेत शुकशुकाट

हेदेखील वाचा

आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नाही…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 Comment
  1. […] मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन आत्महत्… […]

Leave A Reply

Your email address will not be published.