अखेर ग्रामपंचायतच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

21 जागांसाठी होणार पोटनिवडणूक.... असा आहे निवडणूक कार्यक्रम....

9

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या पदांसाठीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 30 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरवात होणार आहेत. मारेगाव तालुक्यात ग्रामपंचायतमधील एकूण 21 पदे रिक्त आहेत. यामध्ये हिवरी, गोंड बुरांडा, खडकी बुरांडा, घोडदरा, म्हैसदोडका, हटवांजरी, नरसाळा, गौराळा, इंदिराग्राम, करणवाडी, हिवरामजरा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

काही ग्रामपंचायतला नामनिर्देशन पत्रच प्राप्त न झाल्याने, काही ठिकाणी राजीनामा दिल्याने, काही ठिकाणी एकच सभासद एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडून आल्यामुळे, काही ठिकाणी जात प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने तर एका ठिकाणी निवडून आलेल्या सभासदाचा मृत्यू झाल्याने या जागा रिक्त झालेल्या होत्या. या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाने आता पोट निवडणूक घ्यायचे ठरवले असून त्यासंबंधीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
दि. 30 नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र भरणे सुरू होणार असून 6 डिसेंबर पर्यंत ते स्वीकारले जाणार आहेत. दि. 7 डिसेंबरला नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून 9 डिसेंबरला नामनिर्देशन पत्र मागे घेतले जाईल. व त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होणार आहेत. दि. 21 डिसेंबरला मतदान होणार असून 22 तारखेला मतमोजणी होणार आहेत. मतमोजणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना दि. 27 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल.

हे देखील वाचा:

तडीपार गुन्हेगाराला पुरड (नेरड) येथून अटक

उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.