मेंढोली येथील चौघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

अवैध दारु विक्रीची तक्रार केली म्हणून महिलेला केली मारहाण

15

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मेंढोली गावातील चौघांविरूद्ध शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात अवैधरित्या देशी दारु विक्री बंद करणे बाबत गावातील महिलांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्याविरूद्ध धाडसत्र अवलंबिले होते.

पोलीस कारवाईमुळे चिडून अवैध दारु विक्रेते पितापुत्र विशाल भाऊराव चांदेकर, भाऊराव भानुदास चांदेकर, मयुर पुरुषोत्तम कावडे व पुरुषोत्तम लक्ष्मण कावडे यांनी तक्रारकर्त्या महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ करुन मारहाण व विनयभंग केला, असा आरोप करत पीडित महिलेने याबाबत तक्रार दिली. तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी चारही पितापुत्रा विरूद्ध विनयभंग व इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.