बहिणीच्या नवऱ्याकडून साळीचा विनयभंग

0 1,120

विवेक तोटेवार, वणी: बहिणीच्या नवऱ्याकडून साळीचा विनयभंग केल्याची घटना वणीतील इस्लामपुरा परिसरात सोमवारी सकाळी घडली. घरी कुणीही नाही हे पाहून सख्या बहिणीच्या पतीकडून विवाहितेचा घरीच विनयभंग झाल्याचे वृत्त आहे.

पीडित ही मुळची चंद्रपूर येथील रहिवाशी आहे. लग्नानंतर ती आपल्या पती, सासू व मुलासोबत इस्लामपुरा जत्रा मैदान येथे राहते. तिची थोरली बहीण ही वणीतच मोमीनपुरा परिसरात राहते. आरोपी हा पत्नी, दोन मुले व एक मुलासह मोमीनपुरा येथे राहतो. काही दिवसांपूर्वी आरोपी व पीडितेच्या बहिणीचे भांडण झाले होते. त्यामुळे ती माहेरी म्हणजे चंद्रपूरला गेली आहे.

सोमवारी सकाळी पीडितेची सासू ही शेजारी गेली होती. तिचा पती गाडी चालक असल्याने तोही सकाळीच बाहेर गेला होता. यावेळी ती घरी आपल्या दोन वर्षांच्या बाळसह होती. सकाळी 9.30 वाजता अब्दुल (32) हा अचानक घरी आला. काही समजायच्या आताच त्याने पीडितेला पकडून तिचा विनयभंग केला.

पीडितेने त्वरित पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध कलम 354, 354 अ, 354 ब नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पो उ नी अशोक काकडे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.