पावसाचे पाणी साचल्याने चौकाला तलावाचे स्वरूप

साचलेल्या पाण्यामुळे गावात विविध आजाराला आमंत्रण

0 200

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली गावातील अंगणवाडी व पाण्याच्या टाकीजवळ परिसरात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. त्या मुळे विविध आजार बळावण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

सततच्या पावसाने एक महिन्यापासून गावातील नाली, डबके भरले असून गावकऱ्यांना पिण्याकरिता सोडणाऱ्या पाण्याच्या टाकी व अंगणवाडी जवळ पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले आहे. ज्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप मधून खराब पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण रोगराई पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

साचलेल्या पाण्याचे विल्हेवाट त्वरित करून गावकऱ्यांच्या आरोग्याचा विचार करावा अशा आशयाचे निवेदन युवा सेनेचे चेतन बरशेट्टीवार यांच्यासह गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सचिव गणेश मुके यांना दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.