एका आठवड्यातच मारेगावतील प्रभाग 4 मध्ये दुसरी आत्महत्या

विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0 19

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही केल्या थांबेना. आज 23 जून रोजी पुन्हा एका विवाहित तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आले. मारेगाव शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील परिसरात ही घटना घडली. प्रमोद श्रावण ठेंगणे (35)असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार, मृतक प्रमोद हा शहरातील प्रभाग क्र. 4 मधील रहिवासी होता. आज दिनांक 23 जून रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला प्रमोदचा मृत्यूदेह दोरीने गळफास घेऊन आढळला.

आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे त्याचे काम बंद झाले होते. त्यामुळे तो गेल्या अनेक दिवसा पासून आर्थिक विवेचनात होता, अशी माहिती प्रमोदच्या निकटवर्तीयांकडून मिळत आहे. प्रमोदच्या पश्चात पत्नी, 7 वर्षाच्या मुलगा व आई आहे.

एका आठवड्यातच प्रभाग 4 मध्ये सलग दुसरी घटना
येथील प्रभाग क्र.4 मध्ये 18 जून च्या सायंकाळी प्रवीण परसुटकर या अविवाहित युवकाने राहत्या घरी वायर ने गळफास घेतला होता. आज पुन्हा याच प्रभागातील प्रमोद ठेंगणे या विवाहित तरुणाने सुद्धा गळफास घेवुन आत्महत्या केली. एका आठवड्यातच परिसरातील दोन व्यक्तींनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने प्रभाग क्र 4 चे रहिवाशी हादरले आहे.

हे देखील वाचा:

स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.