वणीत जागतिक संगीत दिनानिमित्त कलाकारांचा सन्मान

वादक व संगीत शिक्षकांचा सत्कार

0 12

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने वादक व संगीत शिक्षक अभिलाष राजूरकर, अमोल बावणे, चंदन पळवेकर यांच्यासह ज्येष्ठ कलाकार नामदेव ससाने यांना सन्मानीत करण्यात आले. नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार व जैताई मंदिराचे सचिव माधवराव सरपटवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सागरझेप या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर छोटेखानी मैफलही घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर मुने यांनी केले तर आभार नितेश चामटे यांनी मानले. यावेळी शाम चौधरी, सतीश वैद्य, किशोर घुले, विद्यार्थी कु. संजना घुले, ऋतुराज चौधरी, विजय वासेकर, सागर बरशेट्टीवार, आशिष घनकसार, विवेक खिराटकर व गगन वैद्य उपस्थित होते.

हे देखील वाचा:

पावसाळा आला… चला झाडे लावुया, पर्यावरण वाचवुया

वणीतील रविनगर येथील घर (ड्युप्लेक्स) विकणे आहे

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.