आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा सहकुटुंब महाराष्ट्र बचाव आंदोलनात सहभाग

काळे मास्क घालून महाविकास आघाडी सरकारचा निषेध

0 1,392

जब्बार चीनी, वणी: कोरोना काळात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपच्या वतीने राज्यभरात महाराष्ट्र_बचाव आंदोलन करण्यात आलं. ‘आपलं अंगण, हेच रणांगण’ असं ब्रीदवाक्य घेऊन गावागावात हे आंदोलन करण्यात आलं. वणीतही आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी त्यांच्या कुटुंबासह या आंदोलनात सहभाग घेतला. आज कोरोणा ह्या भयंकर महारोगाच्या नियोजनात दिशाहीन व प्रत्येक बाबतीत महाविकास आघाडी सरकार अयशस्वी ठरत असल्याचा त्यांनी आरोप केला.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व त्यांच्या पत्नीने यावेळी काळे कपडे घालून तर आंदोलकांनी यावेळी काळे मास्क घालून राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी बोदकुरवारयांच्या कुटुंबियांसह दिनकर पावडे (महामंत्री, भाजपा यवतमाळ), संजय पिंपळशेंडे (सभापती, पं.स. वणी), रवी बेलुरकर (माजी शहाराध्यक्ष), गजानन विधाते (तालुकाध्यक्ष, भाजपा वणी तालुका), श्रीकांत पोटदुखे (उपाध्यक्ष, न.प.वणी व शहाराध्यक्ष भाजपा वणी शहर) इत्यादींची उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.