‘संबंध ठेवतेस की बदनामी करू….’

तरुणीचे शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0 4,533

विवेक तोटेवार, वणी: एका विवाहित तरुणाने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र पुढे जेव्हा तरुणीने संबंध ठेवण्यास नकार दिला. तेव्हा आरोपीने बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

पीडित तरुणी ही चिखलगाव येथील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी ती वणीमध्ये शिक्षणासाठी यायची. दरम्यान तिचे गावातीलच गजानन भाऊराव टोंगे (33) याच्याशी प्रेमसंबंध जुळले. आरोपी गजानन हा पीडितेला वणीतील जटाशंकर चौकात एका मित्राच्या घरी घेऊन जायचा. मित्राच्या घरी आरोपीने पहिल्यांदा 20 सप्टेंबर 2019 रोजी पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पुढे या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळाली. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी गजानन सोबत भेटण्यास, बोलण्यास व कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई केली. त्यानुसार मुलीने आरोपीशी बोलणे बंद केले. यामुळे आरोपी गजानन आणखीन चिडला व त्याने मुलीला फोनवर धमकी देणे सुरु केले. जर संबंध ठेवले नाही तर मी तुझे कुठेही लग्न होऊ देणार नाही अशी धमकी त्याने मुलीला दिली.

या प्रकाराने पीडिता घाबरली व तिने पोलिसात तक्रार कऱण्याचे ठरवले. आरोपीपासून आपल्या जीवाला धोका असल्यासे सांगत पीडितेने काल शुक्रवारी रात्री वणी पोलिसात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम 376 (2) (N), 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास आरोपीला अटक केली. आरोपी हा विवाहित असून त्याला एक एक वर्षाचा मुलगा असल्याची माहितीही मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.