गोकुळनगर येथे कानिफनाथ महाराज जयंती साजरी

जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, शोभायात्रेने वेधले लक्ष

8

जितेंद्र कोठारी, वणी: सरोदी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी वणीतील गोकुळनगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात. गोकुळ नगर युवा संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. जयंतीनिमित्त मंदिराचा परिसर रांगोळी काढून सजवण्यात आला होता. मंदिरात कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. संध्याकाळी 6 वाजता ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा निघाली. यावेळी कानिफनाथ महाराजांची वेशभूषा केलेला तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. परिसरात भ्रमण केल्यानंतर रात्री 10 वाजता गोकुळनगर येथील मंदिरात शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने सरोदी समाज उपस्थित होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.