कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, आज 8 पॉजिटिव्ह

तालुक्यात कोरोनाचे 22 ऍक्टिव्ह रुग्ण

0 10

जब्बार चीनी, वणी: काही दिवसांआधी तालुक्यातील कोरोनाची मंदावलेली रुग्णसंख्या आता अचानक वाढू लागली आहे. आज मंगळवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे तब्बल 8 रुग्ण आढळून आलेत. यातील 4 रुग्ण हे प्रगतीनगर, 2 रुग्ण झेडपी कॉलनी, 1 रुग्ण सानेगुरुजी नगर तर 1 रुग्ण चिखलगाव येथील आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 22 आहेत.

आज 32 संशयीतांच्या रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. यात 8 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 24 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 3 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली. आजच्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 22 झाले आहेत. यातील 8 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 8 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 6 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

आज आलेल्या रुग्णांवरून 14 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज एकही अहवाल प्राप्त झालेला नाही. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1218 रुग्ण आढळून आलेत. यातील 1171 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा:

कुंभा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरविंद ठाकरे

पहाटे पहाटे मारेगाव येथे पोलिसांनी आवळल्या दारु तस्करांच्या मुसक्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.