लॉकडाऊनचे नियम मोडल्याने आज 64 व्यक्तींवर कारवाई

दीपक चौपाटीवरील चिकन सेंटरवरही कारवाई

0 12

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यानंतरही विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दुकानात गर्दी होऊ देणे इत्यादी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. आज शहरात 64 व्यक्तींवर नगर पालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 17 हजारांपेक्षा अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे.

64 कारवाईपैकी 9 जणांवर विनामास्क, 54 व्यक्तींवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, तर दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने दीपक चौपाटी येथील अहमद नबी चिकन सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. यात विनामास्क फिरणा-यांकडून प्रत्येकी 500 रुपये, सोशल डिस्टन्सिंग न पाळणा-यांकडून प्रत्येकी 200 रुपये तर दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवल्याने चिकन सेंटरवर 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

आज एकूण 17300 रुपयांचा दंड नगर पालिकेकडून वसूल करण्यात आला. दरम्यान शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून आज 8 कोरोना पॉजिटिव्ह व्यक्ती आढळून आलेत.

हे देखील वाचा:

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, आज 8 पॉजिटिव्ह

पहाटे पहाटे मारेगाव येथे पोलिसांनी आवळल्या दारु तस्करांच्या मुसक्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.